अकोल्यातील सभेला आज पंतप्रधान मोदी यांनी हजेरी लावली आणि भाषणाची सुरुवातचं मोदींनी मराठीमधून केली आहे. यावेळी भाषण करत असताना मोदी म्हणाले की, भाजपा महायुती आहे तर, महाराष्ट्राची प्रगती आहे" त्याचसोबत मोदी म्हणाले, महायुतीच्या घोषणापत्रासोबतचं मविआचा गोटाला पत्र देखील आला आहे.
आता तर संपुर्ण देशाला माहित आहे मविआ म्हणजे भ्रष्टाचार, मविआ म्हणजे हजारो करोडांचे घोटाले, मविआ म्हणजे ट्रान्सफर पोस्टींगचा धंदा. असं म्हणत मोदींनी मविआवर टीकास्त्र केले. त्यासोबत ते कॉंग्रेसवर हल्लाबोल करत म्हणाले की, जिथे कॉंग्रेसचं सरकार येत तो राज्य कॉंग्रेसचा शाहिपरिवाराचा एटीएम होऊन जातो. यावेळी हिमाचल, तेलंगणा आणि कर्नाटका सारखे राज्य हे कॉंग्रेसचे एटीएम बनून राहिले आहेत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉंग्रेस आणि मविआ या दोघांवर देखील अकोलाच्या सभेत प्रचारा दरम्यान हल्लाबोल केला आहे.