विधानसभा निवडणूक 2024

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

मनसेची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 45 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

Published by : shweta walge

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 45 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे माहिममधून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर वरळीमधून संदीप देशपांडे यांची वर्णी लावण्यात आली आहे. त्यामुळे वरळीत ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

अमित ठाकरे यांना दादर माहिममधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर वरळीमधून संदीप देशपांडे यांना तर पुण्यात हडपसरमधून साईनाथ बाबर, कोथरुडमधून किशोर शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कल्याण ग्रामीणमधून मी राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राज ठाकरेंनी यापूर्वीच मनसेच्या 9 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामध्ये, ठाणे जिल्ह्यातील ठाणे व कल्याणमधून दोन उमेदवार देण्यात आले आहेत. तर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ दौऱ्यात 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. आता, 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. त्यामध्येही अविनाश जाधव यांचं नाव जाहीर आहे.

यापूर्वी मनसेनं जाहीर केलेले उमेदवार

1. बाळा नांदगावकर - शिवडी, मुंबई
2. दिलीप धोत्रे - पंढरपूर  
3. लातूर ग्रामीण - संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा - बंडू कुटे
5. चंद्रपूर - मनदीप रोडे
6. राजुरा - सचिन भोयर
7. यवतमाळ - राजू उंबरकर
8. ठाणे - अविनाश जाधव
9. कल्याण-डोंबिवली - राजू पाटील

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

Pooja Sawant: पारंपारिक साडीमध्ये पुजा सावंतचा अनोखा अंदाज; पाहा 'हे' फोटो...