मराठवाडा

नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का; माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार

माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठका होत आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत.

याच पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आज सकाळी 8 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते प्रवेश करणार आहेत.

मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार असून प्रताप पाटील चिखलीकर यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पक्षप्रवेशामुळे नांदेडमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.

पुण्याच्या पद्मावती परिसरातून 138 कोटीचं सोनं जप्त

ST Bus Kamgar | एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन दिवाळीपूर्वी होणार; वेतनासठी शासनाकडून 350 कोटी जमा

Diwali 2024: दिवाळीत तुमच्या लूकला आकर्षक रंग देण्यासाठी "या" स्पेशल टिप्स; जाणून घ्या

हिंगोलीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, एक कोटी 40 लाख रुपयांची रक्कम जप्त

Mango Leaf: आंब्याच्या पानांचे तोरण सणांमध्ये का लावतात? जाणून घ्या महत्त्व