मराठवाडा

माजी मंत्री सुरेश नवले बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार; म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

विकास माने, बीड

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता माजी मंत्री सुरेश नवले बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळत आहे. यातच त्यांनी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट देखील घेतली आहे.

याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना सुरेश नवले म्हणाले की, या अगोदरही जरांगे पाटील यांना मी विनंती केलेली आहे. बीड मतदारसंघातून मी निवडणूक लढवणार आहे. आपण आपला पाठिंबा मला द्यावा. पूर्वीही मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. काल ही त्यांच्या भेटीला गेलो होतो. काल निर्णय काही झाला नाही. निवडणूक लढवायची नाही लढवायची. परंतु 20 तारखेला बहुधा पाटलांचा निर्णय होईल.

यासोबतच ते म्हणाले की, निवडणूक लढवायची असेल तर काय करायचे निवडणूक लढवायची नसेल तर काय करायचे 20 तारखेला सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये हा ते निर्णय घेणार आहेत. माझी विनंती आहे की, जरांगे पाटील यांचा पाठिंबा मला मिळाला तर आनंद आहे. जरांगे पाटील यांची त्सुनामी आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसेलच. असे सुरेश नवले म्हणाले.

Attack On Netanyahu's House | इस्राइलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर हमासकडून हल्ला

Rajendra Shingne Join SP NCP: अजित पवारांना बसणार धक्का! आमदार राजेंद्र शिंगणे हाती घेणार तुतारी...

Mahayuti Jagavatap: महायुतीचं जागावाटप फायनल;पाहा कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार ?

Vijaya Rahatkar : राष्ट्रीय महिला आयोगापदी मिळाल्या पहिल्या मराठी अध्यक्षा, विजया रहाटकर यांची नियुक्ती

Ramesh Chennithala: काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला 'मातोश्री'वर दाखल