निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता मराठा क्रांती मोर्चाकडून पुण्यात मराठा उमेदवार देण्याची तयारी असल्याची माहिती मिळत आहे. मराठा क्रांती मोर्चाने ठराव करून खडकवासला विधानसभा मतदारसंघातून दीपक मानकर यांनी निवडणूक लढवावी असा ठराव केला आहे.
नुकत्याच झालेल्या सकल मराठा आणि मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत एकमताने ठराव करून मराठा उमेदवार देण्याची तयारी पुण्यातून सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. दीपक मानकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष आहेत. राष्ट्रपती नियुक्त आमदारकी न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.