विधानसभा निवडणूक 2024

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयावर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया. 'मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणीही सत्तेत येऊ शकत नाही.' असे त्यांनी सांगितले.

Published by : shweta walge

थोडक्यात

  1. विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे.

  2. महायुतीच्या विजयावर मनोज जरांगे पाटील फॅक्टर फेल झाल्याची चर्चा.

  3. "आम्ही मैदानातच नाहीत, त्यामुळे आम्हाला फेल झालं असं कसं म्हणू शकता?" अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला. निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर मनोज जरांगे पाटील फॅक्टर फेल झाल्याची चर्चा होत आहे. यावर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अरे आम्ही मैदानातच नाहीत. तरी तुम्ही आम्हाला फेल झाला म्हणता. कोण निवडून आला काय आणि कोण पडला काय…, याचं आम्हाला काही सोयरं सुतकच नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

ते म्हणाले की, एक महिन्याभर थांबा ,तुम्हाला मराठ्यांची ताकद कळेल. या निवडणुकीत मराठ्यांचे 204 आमदार झाले. मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणीही सत्तेत येऊ शकत नाहीत. आम्ही मैदानात असतो तर मराठ्यांनी एक शिक्का काम केलं असतं. पण आम्ही सांगितलं होत मराठा समाजाला जे करायचं ते करा. मी दोघांचेही अभिनंदन करतो निवडून येणाऱ्याचही आणि एक पडणाऱ्याचंही… मराठ्यांच्या फॅक्टरला बघूनच यांनी मराठ्यांना तिकीट दिले ना…, असं मनोज जरांगे म्हणालेत.

एखाद्या गोष्टीचं श्रेय कधी घ्यावं तर मोठ- मोठे कार्यक्रम घ्यावेत आणि मग म्हणावं. हा आमच्यामुळे आला आणि तो आमच्यामुळे आला… जेवढे लोक निवडून आलेत ना… त्यांच्या मागे मराठा फॅक्टर आहे. एखाख्या आमदाराने म्हणावं की तो मराठ्यांच्या जीवावर निवडून आला नाही. जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमची सगळी हयात जाईल. तरी तुम्हाला कळणार नाही. तुम्ही मराठ्यांच्या कशाला नादी लागता. मराठाच मैदानात नाही आणि काही बांडगुळं बोलत बसतेत. जरांगे फॅक्टर फेल झाला म्हणतेत. अरे पण आम्ही मैदानातच नाही, असं मनोज जरांगे म्हणालेत.

हे सरकार मराठ्यांच्या ताकदीवर आलेलं आहे. आम्ही कुणाच्या जत्रेत जाऊन नळ्या सारखा खेळ नाही करत. लोकांच्या गर्दी नाही जायचं आणि माझंच आहे म्हणायचं. आमच्या फॅक्टरमुळंच सरकार आलं न् काय अन् काय बोलतेत. यांना दुसऱ्याचं पाळणं लोटायची सवय आहे, असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी