विधानसभा निवडणूक 2024

Mahim Vidhan Sabha | निकालापूर्वीच Uddhav Thackeray यांचा भाजपला धक्का

माहीम विधानसभा भाजप उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला, भाजपला मोठा धक्का. महेश सावंत यांच्या उपस्थितीत, ठाकरे गटाची स्थिती मजबूत.

Published by : shweta walge

थोडक्यात

  1. माहीम विधानसभा भाजप उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे, ज्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

  2. सचिन शिंदे यांच्या ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या वेळी माहीम येथील ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत देखील उपस्थित होते, यामुळे ठाकरे गटाच्या स्थानाची मजबूत झालेली दिसते.

  3. सचिन शिंदे यांच्या निर्णयामुळे भाजपची अवस्था बिघडली आहे, तसेच अमित ठाकरेंना अधिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

माहीम विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठे खिंडार पडले आहे. माहीम विधानसभा भाजप उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी माहीम येथील ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत देखील उपस्थित होते. सचिन शिंदे यांच्या या निर्णयाने भाजपला धक्का बसलाच आहे, त्यासोबतच अमित ठाकरेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

यावेळी सचिन शिंदे म्हणाले की, मी गेली 20 वर्षे भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. पक्षवाढीसाठी काम केलं माझ्यावर अन्याय झाला म्हणणार नाही, पण न्याय देखील मिळाला नाही, असं सचिन शिंदे यांना म्हटलं. मी उद्धव ठाकरेंना भेटलो माझ्या कामात ते सहकार्य करणार आहेत. माझ्या परिने मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. कार्यकर्ते परिस्थितीनुसार माझ्या सोबत उभे आहेत. मी अत्यंत विचारपूर्वक, जनतेच्या सेवेला प्राधान्य देत हा निर्णय घेतला आहे.

NEWS PLANET With Vishal Patil | 'लाडकी बहीण' ठरणार गेमचेंजर? लाडक्या बहिणींची कुणाला साथ?

Nilesh Rane | Kokan Vidhansabha | कोकणात कुणाचं वारं? निलेश राणे Exclusive

Mumbai Vidhansabha Poll | मुंबईकरांचा कौल कोणाला? 'या' नेत्यांना मिळणार पराभवाचा धक्का ?

मणिपूरमध्ये आंदोलनाला आठवडाभर स्थगिती, ‘कोकोमी’चा निर्णय

'त्या' प्रकरणी अजित पवार यांना बारामती कोर्टाचे समन्स