विधानसभा निवडणूक 2024

विधानसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला?

विधानसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आणि महायुती दोन्ही आघाड्यांतील पक्षांकडून उमेदवाराची यादी जाहीर करण्यात येत आहे. भाजपने सर्वात प्रथम 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर भाजपने 22 जणांची यादी जाहीर केली. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात 153 जागा लढवणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. तसेच मुंबईमधील 18 जागांपैकी 14 जागा भाजप लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळत आहे. भाजप 153, शिवसेना 80 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 55 जागांवर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपकडून पुन्हा एकदा 9 आकड्याचे गणित जुळणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये रस्सीखेंच सुरु आहे. महाविकास आघाडीतही अनेक जागांवरुन खल सुरु आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. पुढील फॉर्म्युल्यानुसार महायुती निवडणूक लढण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजप 153, शिवसेना 80 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 55 जागांवर लढणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. जागा वाटपात पुन्हा एकदा भाजपकडून 9 आकड्याचे गणित जुळण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजप मुंबईत 18 जागा लढवणार आहे. भाजपकडून 14 जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत, तर अद्यापही 4 जागांवर उमेदवार निश्चिती बाकी आहे.

'लाडकी बहिण योजना बंद करण्याचा काँग्रेसचा घाट', भाजपचे ट्वीट

Skin Care : दिवसातून कितीवेळा चेहरा धुवावा? असा निवडा योग्य फेसवॉश

वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी; नऊ प्रवासी जखमी; दोन जण गंभीर

यंदाच्या दिवाळीत बाजारातील तयार फराळाला अधिक मागणी

'राजकारणातील टरबूज्या...' अनिल देशमुखांचा फडणवीसांवर निशाणा