विधानसभा निवडणुक तोंडावर आली आहे आणि अशातच वेगवेगळ्या पक्षात अनेक हालचाली पाहायला मिळत आहेत. तर अनेक पक्षांना मोठा धक्का देखील पाहायला मिळत आहे. पक्षाकडून आणि नेत्यांकडून बैठकी घेतल्या जात आहेत. तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष नेत्यांकडून अनेक योजना आखल्या जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांची जागा वाटप आणि उमेदवारांच्या नावांची यादी हळू हळू समोर येत आहे. महायुतीचं जागावाटप फायनल झाल्याची माहिती समोर आली आहे.
अमित शाहांसोबतच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतं आहे तर आज जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय झाला आहे. सुत्रांनी या संदर्भात माहिती दिली असून भाजपला एकूण 155 शिवसेनेला 78 राष्ट्रवादीला 55 जागा मिळण्याची शक्यता आहे. यावर अजित पवार म्हणाले, काल दिल्लीत बैठक झाली महायुतीमध्ये सगळ काही सुरळीत सुरु आहे तर तिन्ही नेते मिळून एकत्र प्रेस घेऊ आणि त्यात सगळ्याची माहिती दिली जाईल.
त्यात कोणाला किती जागा दिल्या जातील हे सांगणार आहेत. आता सगळ्यांच लागलेलं आहे ते कोणाला कितीजागा दिल्या जातील आणि कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार कोणत्या ठिकाणासाठी निवडणुक लढणार याकडे. तर आता महायुतीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.