Mahayuti and MVA not given candidates on 36 constituency 
विधानसभा निवडणूक 2024

36 जागांवर महायुती अन् मविआचीही 'वेट अँड वॉच' ची भूमिका

विधानसभेच्या राज्यातील 36 जागा अशा आहेत की, जिथे महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हींनी अद्याप उमेदवार दिलेले नाहीत. 252 जागा अशा आहेत, जिथे दोन्हींनी किंवा त्यापैकी एकाने उमेदवार दिले आहेत.

Published by : Team Lokshahi

विधानसभेच्या राज्यातील 36 जागा अशा आहेत की, जिथे महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हींनी अद्याप उमेदवार दिलेले नाहीत. 252 जागा अशा आहेत, जिथे दोन्हींनी किंवा त्यापैकी एकाने उमेदवार दिले आहेत. या 36 पैकी 13 जागा या विदर्भातील आहेत. त्यात आकोट, अकोला पश्चिम, कारंजा, मेळघाट, मोर्शी, आर्वी, सावनेर, उमरेड, गडचिरोली, चंद्रपूर, वरोरा, आर्णी आणि उमरखेडचा समावेश आहे.

नांदेड दक्षिण, देगलूर, मालेगाव मध्य, डहाणू, वसई, भिवंडी पूर्व, कल्याण प., उल्हासनगर, बोरीवली, वर्सोवा, मानखुर्द शिवाजीनगर, शिवडी, पेण, खडकवासला, पुणे कँटोन्मेंट, श्रीरामपूर, बीड, माढा, सोलापूर मध्य, पंढरपूर, माळशिरस, फलटण, कोल्हापूर उत्तरमध्ये दोघांनीही उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

दोन्ही बाजूंनी उमेदवार जाहीर न होण्यामागे काही कारणे सांगितली जातात. आर्वीत ­आमदार दादाराव केचे की, सुमित वानखेडे हा निर्णय झालेला नाही. मविआकडून वर्धेचे खासदार अमर काळे यांच्या पत्नी मयुरा यांना उमेदवारी मिळू शकते. सावनेरमध्ये आमदार सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा या काँग्रेसच्या उमेदवार असतील, हे जवळपास स्पष्ट आहे. भाजपचा उमेदवार ठरायचा आहे.

Congress Candidate 3nd List: कॉंग्रेसची तिसरी यादी जाहीर, या नावांची घोषणा

Congress Candidate 3nd List: कॉंग्रेसची तिसरी यादी जाहीर, 'या' नावांची घोषणा

Special Report | Balasaheb Thorat | थोरातांचा समन्वय सार्थकी लागणार? अदलाबदल करून तोडगा निघणार?

दहिसर विधानसभेची उमेदवारी विनोद घोसाळकर यांना जाहीर

School Bags: दप्तराच्या ओझ्यामुळे मुलांची पाठदुखी बनतेय पालकांची डोकेदुखी