राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (20 नोव्हेंबर) मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ असून या सर्व मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी एकूण 4,136 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी 2,136 अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी एकूण 159 मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आणि 2086 अपक्षांसह तब्बल 4 हजार 136 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीने 149 उमेदवार उभे केले आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 81 तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने 59 उमेदवारांना तिकीट दिले आहे. विरोधी पक्षात महाविकास आघाडी (MVA), काँग्रेसने 101 उमेदवार उभे केले आहेत, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (UBT) 95 उमेदवार आणि NCP (शरदचंद्र पवार) 86 उमेदवार रिंगणात आहेत.
काही मतदारसंघात मित्रपक्षांमध्ये मैत्रीपूर्ण निवडणूक होणार आहे. छोट्या राजकीय पक्षांमध्ये, बहुजन समाज पक्षाने (BSP) 237 उमेदवार उभे केले आहेत आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) ने 17 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
दोन हजार 136 उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून यंदा बंडखोरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे याचा पक्षांना किती तोटा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण यावेळी खरी लढत ही महायुती वि. महाविकास आघाडी अशीच पाहायला मिळणार आहे.