विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Vidhansabha New Trend : राज्याच्या राजकारणात नवा ट्रेंड | एकाच कुटुंबात 2 पक्ष, 2 झेंडे

राज्याच्या राजकारणात नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. एकाच कुटुंबात 2 पक्ष, 2 झेंडे पाहायला मिळत आहेत. राणे आणि नाईकांच्या उमेदवारीसाठी वेगळे तंबु बांघल्याचं दिसून येत आहे.

Published by : Team Lokshahi

राज्याच्या राजकारणात नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. एकाच कुटुंबात 2 पक्ष, 2 झेंडे पाहायला मिळत आहेत. राणे आणि नाईकांच्या उमेदवारीसाठी वेगळे तंबु बांघल्याचं दिसून येत आहे. तर भुजबळ कुटुंबात ही नवीन ट्रेंडची चर्चा आहे. महायुतीमध्ये एकमेकांना उमेदवारांचा पुरवठा केला जात आहे. तर नवी मुंबईत वडिलांना भाजपची उमेदवारी आणि मुलाच्या हाती तुतारी असल्याच दिसून आलं आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याच्या राजकारणात उमेदवारीसाठी एकाच कुटुंबात 2 पक्ष, 2 झेंडे म्हणजेच उमेदवारी तर आहे मात्र पक्ष वेगवेगळे आहेत. नवी मुंबईच्या नाईक कुटुंबात वडिल गणेश नाईक यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे, तर नाराज मुलगा संदीप नाईक यांनी हाती तुतारी घेतली आहे. त्यांना आता तुतारी म्हणजे राष्ट्रवादीकडून तिकीट दिलं जाणार असल्याचं कळत आहे.

तर दुसरीकडे राणे कुटुंबात ही नारायण राणे हे भाजपाच्या तिकिटावर खासदार झाले तर मुलगा नितेश राणे यांना भाजपने आता आमदारकीसाठी तिकिट दिलेलं आहे आणि त्यांचा दुसरा मुलगा निलेश राणे यांनी तिकिटासाठी शिवसेनेची वाट धरलेली आहे. तर तिसरीकडे नाशिकच्या भुजबळ कुटुंबात ही भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ मविआच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे भुजबळांना राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडून उमेदवारी पक्की मानली जात आहे.

Maharashtra Assembly Election 2024 LIVE : माढा विधानसभेसाठी शरद पवार गटाचा उमेदवार निश्चित

Mohol Vidhan Sabha | मोहोळमध्ये राष्ट्रवादीला धक्का, 'या' नेत्याने सोडली Ajit Pawar यांची साथ

Diwali 2024: यंदाची दिवाळी बळीराजासाठी काटकसरीची जाणार?

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

'राऊतांना शिवसेना संपवायची होती' गुलाबराव पाटलांचा आरोप, काय म्हणाले पाहा...