विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबंरला झाले आणि 23 नोव्हेंबंरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. हा निकाल अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरला होत कारण, या निकालात मविआ जिंकेल अशी अपेक्षा अनेक लोकांकडून करण्यात आलेली होती मात्र मविआ फक्त 55 च्या आसपास जागा मिळाला आणि राज ठाकरेंच्या मनसेला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नसून मनसेचे खाते देखील उघडले गेले नाही. आता या निकालावरून विरोधीपक्षाकडून अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. मविआ आणि इतर पक्षाकडून मोठा संघर्ष पाहायला मिळाला मात्र महायुतीला २२० जागांवर बहुमत मिळवत आपला विजय कायम ठेवला. अशातच महायुतीमधून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून महायुतीत तीव्र स्पर्धा पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रिपदाचा बिहार पॅटर्न?
मात्र आता असा प्रश्न पडला आहे की, यावेळी महाराष्ट्रात जागांच्या जोरावर मुख्यमंत्री ठरवणार की बिहार पॅटर्न प्रमाणे मुख्यमंत्री केला जाणार? बिहारमध्ये भाजपाचे सर्वाधिक आमदार असले तरी देखील नितीशकुमारांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्यात आले होते. या पद्धतीनुसार महाराष्ट्रातही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून नेतृत्वात सरकार येणार का? असा प्रश्न पडला आहे. महायुतीने 220 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे त्यामध्ये भाजपाला 128 जागा, एकनाथ शिंदे शिवसेनेला 53 जागा तर अजित पवार राष्ट्रवादीला 36 जागा आहेत. यावरून आता यांच्यापैकी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण ठरणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे.