थोडक्यात
काल झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला.
भाजपाने जवळपास ७० टक्के जागा जिंकल्या आणि महायुतीमध्ये किंगमेकर ठरला.
भाजपाने राज्यात आणि महायुतीमध्ये सर्वाधिक जागा लढवल्या, ज्यामुळे जागा विजयाच्या बाबतीत त्याचा स्ट्राईक रेट चांगला ठरला.
काल विधानसभा निवडणुकीचा निकाल निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र महायुतीमध्ये किंगमेकर ठरला तो म्हणजे भाजप कारण भाजपने जवळपास ७० टक्के जागा जिंकल्या. भारतीय जनता पक्षानं राज्यात व महायुतीमध्ये सर्वात जास्त जागा लढवल्या होत्या. त्यामुळे जागा विजयाच्या बाबतीत भाजपाचा स्ट्राईक रेट चांगला ठरण्याचीही शक्यता आहे.
विधानसभेत भाजपाने 132 तर शिवसेने 55 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 40 जागांवर आघाडी घेतली. तब्बल 200 पेक्षा जास्त जागांवर महायुतीला आघाडी असून अनेक उमेदवार विजयी झाले.
विदर्भ ही भारतीय जनता पक्षाला कायम साथ देणारी भूमी त्यांनी काबीज केलीच आहे पण त्याचबरोबर मराठा आंदोलनाने अस्वस्थ झालेला मराठवाड्याचा भाग तसेच पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याचा पट्टादेखील निकालांनी भाजपने अनुकूल केला आहे. पाच वर्षांपूर्वी जिंकूनही पक्षाला सत्ता स्थापन करता आली नाही, याचे शल्य केवळ कार्यकर्त्यांच्या मनात नव्हते तर नागरिकांच्याही मनात होते, असा आजच्या निकालांचा सोपा अर्थ काढला जाऊ शकेल.
लोकसभेत ‘मविआ’पेक्षा भाजप केवळ एक टक्का मतांनी मागे होता. त्या एक टक्क्याची भरपाई करत यावेळी पक्षाने महाराष्ट्रातल्या बहुतेक भागात बाजी मारली. जिल्हानिहाय अवलोकन केले तर आता प्रत्येक जिल्ह्यात कमळ फुलले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या जातीमुळे त्यांना यश मिळत नाही, असे साधारणतः बोलले जात होते मात्र ही अडथळ्याची शर्यतही भारतीय जनता पक्षाने या वेळेला पार केली असून नेतृत्वाचा चेहरा हा सर्वमान्य असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण?
महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न सर्वांना पडलाय. महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी 25 नोव्हेंबरला होणार आहे.