विधानसभा निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 : मतदान ओळखपत्र हरवलय? तरीही करता येणार मतदान, जाणून घ्या कसं

मतदान ओळखपत्र हरवलंय? चिंता करू नका, तुम्ही मतदान करू शकता! अधिकृत मतदार यादीत नाव असल्यानंतर अन्य वैध ओळखपत्रासह मतदान करा. जाणून घ्या अधिक.

Published by : shweta walge

थोडक्यात

  1. विधानसभा निवडणुकीत आपल्या आवडीचा उमेदवार निवडण्यासाठी मत देणं खूप महत्त्वाचं आहे.

  2. मतदान करण्यासाठी मतदाराच्या कडे वोटर आयडी असणं गरजेचं आहे, पण अनेक लोकांकडे वोटर आयडी नाही किंवा तो हरवलेला आहे.

  3. वोटर आयडी नसल्यास, मतदार यादीत नाव असलं पाहिजे आणि निवडणूक स्लिप किंवा वैध ओळखपत्रासोबत मतदान करता येईल.

राज्यभरात लवकरच विधानसभा निवडणुक पार पडणार आहे. निवडणुकीत आपल्या आवडीचा उमेदवार निवडूण आणण्यासाठी मतदाराने मत देण फार महत्वाच आहे. पण मतदान करण्यासाठी मतदाराकडे वोटर आयडी असणं गरजेचं आहे. पण, आपल्या देशात असेही अनेक लोक आहेत, ज्यांच्याकडे अद्याप मतदान वोटर आयडी नाही किंवा अनेकांचे मतदान आयडी हरवले आहेत. अशा परिस्थितीत मतदान करण्यासाठी काय करावं, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

जर तुमचं मतदार ओळखपत्र हरवलं असेल तरीही तुम्हाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे. भारतीय निवडणूक आयोगानुसार मतदार ओळखपत्राशिवायही मतदान करु शकतो. तुम्ही तुमचं नाव मतदार यादीत तपासू शकता आणि मतदान केंद्रावर अन्य वैध ओळखपत्र (जसे की आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) सादर करून मतदान करू शकता.

जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल, तरीही तुम्ही निवडणुकीत मतदान करू शकता. यासाठी, तुमचं नाव अधिकृत मतदार यादीत असलं पाहिजे. जर तुमचं नाव यादीत असेल, तर तुम्ही घरपोच आलेली निवडणूक स्लिप प्रिंट करून मतदान केंद्रावर जाऊ शकता.

निवडणूक स्लिपसोबत तुम्हाला खालीलपैकी एक वैध कागदपत्र मतदान केंद्रावर सादर करावं लागेल:

आधार कार्ड

पासपोर्ट

ड्रायव्हिंग लायसन्स

पॅन कार्ड

इतर सरकारी ओळखपत्र

या कागदपत्रांसोबत तुम्ही मतदान करू शकता, त्यासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक नाही.

NEWS PLANET With Vishal Patil |नारा एक, भूमिका अनेक; 'बटेंगे तो कटेंगे'वरून पंकजा मुंडेंचा घरचा आहेर

Rajesaheb Deshmukh Parli Assembly election 2024 : परळीत हाय व्होल्टेज सामना! राजेसाहेब देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे

Dhananjay Munde Parli Assembly election 2024 : धनंजय मुंडेंसमोर मराठा उमेदवाराचे आव्हान

PM Modi Sabha LIVE: पंतप्रधान मोदी यांच्या सभेला अजित पवारांची पाठ

Latest Marathi News Updates live: राहुल गांधी यांनी अचानक नांदेडच्या बसस्थानकात दिली भेट,नागरिकांशी साधला संवाद