लोकशाही आणि 'रुद्र'चा अचूक आणि वेगवान एक्झिट पोल आता आपण लोकशाही मराठीवर पाहणार आहोत. यासाठी आपल्याकडे चर्चेसाठी मान्यवर उपस्थित असून आपण त्यांचाशी एक्झिट पोलवर सखोल चर्चा करुन ती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. राज्यात सरासरी 58 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात सत्तापालट होणार की महायुती सत्तेत कायम राहणार?
महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. लोकशाही मराठी आणि रूद्र रिसर्च अनलॅटिक्सच्या एक्झिट पोल महाराष्ट्रात महायुतीला १२८-१४२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच महाविकास आघाडीला १२५-१४० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अपक्ष आणि इतर पक्षाला मिळून १८-२३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता नेमका निकाल काय येणार आहे याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलं आहे.
महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांना किती जागा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर महाराष्ट्रातील जनतेचा नेमका कल कोणाकडे आहे हे निकालानंतरच कळू शकेल.
महायुतीतील घटक पक्षाला किती जागा मिळण्याचा अंदाज?
भाजप- ८०-८५
शिवसेना (एकनाथ शिंदे) - ३०-३५
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - १८-२२
महाविकास आघाडीतील घटक पक्षाला किती जागा मिळण्याचा अंदाज?
काँग्रेस - ४८-५५
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - ३९-४३
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) - ३८-४२
मनसे - ००
वंचित विकास आघाडी - ००
इतर - १८-२३
लोकशाही-रुद्रच्या एक्झिट पोलनुसार भाजप ठरणार मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.
महायुतीला 128 ते 142 जागा मिळण्याची शक्यता
मविआला 125 ते 140 जागा मिळण्याचा अंदाज
भाजपला ८० ते ८५ जागा मिळण्याची शक्यता
शिवसेनेला ३० ते ३५ जागा मिळण्याचा अंदाज
ठाकरेंच्या शिवसेनेला 39 ते 43 जागा मिळण्याची शक्यता
राष्ट्रवादीला १८ ते २२ जागा मिळण्याचा अंदाज
राष्ट्रवादी SPला 38 ते 42 जागा मिळण्याचा अंदाज
काँग्रेसला 48 ते 55 जागा मिळण्याची शक्यता
महाराष्ट्रामध्ये वोट शेअरिंगची टक्केवारी किती असणार आहे?
भाजप - २३ %
शिवसेना - ११ %
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ०७ %
काँग्रेस - १४ %
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - १२ %
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) - १२ %
मनसे - ०२ %
वंचित - ०३ %
इतर - १६ %
लोकशाही मराठी आणि 'रुद्र'चा अचूक आणि वेगवान एक्झिट पोल पाहण्यासाठी क्लिक करा-