LIVE NEWS Updates 
विधानसभा निवडणूक 2024

Dharavi Vidhan Sabha Update :धारावीत बंडखोरी टळली, अपक्ष उमेदवार बाबुराव माने यांची माघार

Team Lokshahi

Dharavi Vidhan Sabha Update :धारावीत बंडखोरी टळली, अपक्ष उमेदवार बाबुराव माने यांची माघार

धारावीतील महाविकास आघाडीतील संभाव्य बंडखोरी टळली आहे. काँग्रेसच्या ज्योती गायकवाड धारावीतून उमेदवार असून ज्योती गायकवाड या वर्षा गायकवाड यांच्या भगिनी आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला होता मात्र पक्षाच्या सूचनेनुसार बाबुराव मानेंनी धारावीतून अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

धनत्रयोदशीला सोने-चांदीच्या खरेदीत घट

सोने-चांदीच्या विक्रमी दरामुळे खरेदीत निरुत्साह दिसून आला आहे. धनत्रयोदशीला सोने-चांदीच्या खरेदीत घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खरेदीत तब्बल 10 टक्क्यांची घट झाली आहे. वर्षभरात सोन्याच्या दरात 33 टक्के वाढ झाली आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभरात थंडीची चाहूल

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्याही खाली गेले आहे. तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता देखील आहे.

ऐन दिवाळीत राज्यात 2 दिवस पावसाची शक्यता

राज्यात पुढील 2 दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याकडून याबाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या 3 जिल्ह्यात ढगाळ वातावरण असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, विदर्भातील अकोला, वर्धा आणि नागपूर या 3 जिल्ह्यात ढगाळ वातावरणसहित किरकोळ पाऊस पडू शकतो.

इस्रायलकडून गाझापट्टीत जोरदार हवाई हल्ले सुरु

इस्रायलकडून गाझापट्टीत जोरदार हवाई हल्ले सुरु आहेत. हल्ल्यात 60 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 12 महिला आणि 20 मुलांचा समावेश आहे.

धारावीतील महाविकास आघाडीतील संभाव्य बंडखोरी टळली

धारावीतील महाविकास आघाडीतील संभाव्य बंडखोरी टळली आहे. काँग्रेसच्या ज्योती गायकवाड धारावीतून उमेदवार आहेत. ज्योती गायकवाड या वर्षा गायकवाड यांच्या भगिनी आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने यांनीदेखील अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र पक्षाच्या सूचनेनुसार बाबुराव मानेंनी धारावीतून अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

'इंडिया आघाडीचं सरकार बहुमताने येईल', सचिन पायलट यांचं वक्तव्य

महाराष्ट्रात इंडिया आघाडीचं सरकार बहुमताने येईल. स्वार्थी सत्ताधाऱ्यांना लोक पराभूत करणार असल्याचे विधान कॉंग्रेसच्या सचिन पायलट यांनी केलं आहे.

लक्ष्मीपूजनाच्यादिवशी पुणे मेट्रो संध्याकाळी 6 ते 10 बंद राहणार

लक्ष्मीपूजनादिवशी पुणे मेट्रो संध्याकाळी 6 ते 10 बंद राहणार आहे. 1 नोव्हेंबरला पुणे मेट्रोची सेवा सकाळी 6 ते संध्या. 6 पर्यंतच असणार आहे. 2 नोव्हेंबरपासून पुणे मेट्रोची सेवा नेहमीप्रमाणे सुरु होणार आहे.

भाजपनं शिंदे, अजित पवारांना संपवलं, रमेश चेन्नीथला यांचा हल्लाबोल

भाजपने शिंदे आणि अजित पवार यांना संपवलं असल्याचा हल्लाबोल महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे. तर चेन्नीथला यांचा अभ्यास कमी असून ठाकरेंना काँग्रेसनं संपवलं असल्याचा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

"आबा पाटलांविषयीच्या वक्तव्यावरून अजित पवार, फडणवीसांवर गुन्हा दाखल करा," संजय राऊतांची मागणी

आर. आर. पाटील प्रामाणिक आणि कर्तबगार गृहमंत्री होते. त्यांनी कधीच चुकीचं काम केलं नाही. आर. आर. पाटलांविषयी केलेल्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांवर गुन्हा दाखल करावा असं वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याची तारीख बदलली

पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याची तारीख बदलली असून 8 नोव्हेंबरऐवजी 12 नोव्हेंबरला होणार आहे. पंतप्रधान मोदींची पुण्यात एस पी कॉलेजच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी मोदींची सभा होणार आहे.

आर आर पाटलांविषयी काय म्हणाले अजित पवार?

'आर. आर. पाटलांनी केसानं गळा कापण्याचा प्रयत्न केला' असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

मनोज जरांगे मराठा, दलित, मुस्लीम मतांचं समीकरण जुळवणार?

मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मराठा, दलित, मुस्लीम मतांचं समीकरण जुळवणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता जरांगेंची महत्त्वाची बैठक होणार असून विविध समाजाच्या धर्मगुरूंशी ते चर्चा होणार आहेत. अर्ज भरण्याची मुदत संपताच जरांगे पाटील सक्रिय झाले आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले 3 ब्रिटिशकालीन बॉम्ब; परिसरात खळबळ

पिंपरी चिंचवड मध्ये तीन ब्रिटिशकालीन बॉम्ब आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या प्रेम लोक पार्क परिसरात आढळलाय. महानगर पालिकेकडून लिकेज काढण्यासाठी खोदकाम सुरू असताना कामगारांना तीन ब्रिटिशकालीन बॉम्ब आढळलेत. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झालय.

घर का भेदी लंका ढाये! ड्रग्स विक्रेत्यांना स्थानिक व्यक्तीचा सपोर्ट; रात्रीच पोलिसांनी टाकला छापा

नवी मुंबईतील खारघर मध्ये नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत ड्रग्स विक्रेते 20 नायजेरियन आणि 27 लाख रुपयांचे ड्रग्स केले हस्तगत.

सीएमपदासाठी भाजपकडून फडणवीसांचा चेहरा?

भाजपकडून सीएमपदाबाबत सूचक बॅनरबाजी करण्यात आली आहे. प्रतीक्षा संपली... 23 नोव्हेंबर नवमहाराष्ट्राची नवगाथा लिहायला तो पुन्हा येतोय' आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. भाजप प्रदेश कार्यालयात पक्षाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू होताच भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनरबाजीतून पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपलाच मुख्यमंत्री होणार असल्याचं सांगत बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपच्या बॅनरमुळे महायुतीत बिघाडीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

माहिम विधानसभेत भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा

माहिम विधानसभेत भाजपने मनसे नेते अमित ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अमित ठाकरेंना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांची अडचण झाली आहे. शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकरांचं निवडून येणं कठीण होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सीएम शिंदेंचीही पाठिंबा देण्याची इच्छा असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच उद्धव ठाकरेंकडे मतं जाऊ नये म्हणून शिंदेंनी उमेदवार दिला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Dharavi Vidhan Sabha Update :धारावीत बंडखोरी टळली, अपक्ष उमेदवार बाबुराव माने यांची माघार

Madha Vidhansabha| माढ्यात अभिजीत पाटील नावाचे 4 उमेदवार; सर्वांचे अर्ज मंजूर | Marathi News

Mohol Vidhan Sabha | Jayant Patil यांचं काॅल रेकाॅर्डिंग व्हायरल, पाटलांच्या मनातले उमेदवार....

Sada Sarvankar यांची ट्विट करत Raj Thackeray यांना विनंती

निवडणुका कशा होतील? LICला मुंबई हायकोर्टाने फटकारलं