विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून आता पहिली यादी जाहीर केली जात आहे. तर 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याचपार्श्वभूमीवर आता ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली असून त्यात केदार दिघे यांना पाचपाखाडीमधून उमेदवारी मिळाली आहे. केदार दिघे एकनाथ शिंदेच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून केदार दिघे यांना कोपरीत पाचपाखाडीमधून उमेदवारी मिळाली आहे. तर पाचपाखाडीमधून एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे अशी लढत पाहायला मिळणार आहे.
शिंदेंच्या उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर झाली आणि त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील पाचपाखाडीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतणार आहेत. मात्र त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेतून केदार दिघे जे आनंद दिघेंचे पुतणे आहेत आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात आता आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे हे निवडणुकीच्या रिंगणात शिंदेंच्या विरोधात उतरणार आहेत कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून केदार दिघेंना पाचपाखाडीमधून उमेदवारी दिली गेली आहे.