Rajan Salvi got AB form from shivsena ubt 
कोकण

Rajan Salvi | राजन साळवी यांना शिवसेना(UBT) कडून AB फॉर्म

शिवसेना (UBT) ने उमेदवार यादी अद्याप जाहीर केली नसली तरी पक्षाकडून राजन साळवी यांना AB फॉर्म देण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. राजापूर मतदारसंघातून राजन साळवी निवडणूक लढणार असल्याची शक्यता आहे.

Published by : Team Lokshahi

राजन प्रभाकर साळवी आता चौथ्यांदा निवडणुकीस सामोरे जात आहेत. या आधी राजन साळवी २००९ , २०१४ आणि २०१९ मध्ये असे तीन वेळा आमदार झाले आहेत. शिवसेना (UBT) ने उमेदवार यादी अद्याप जाहीर केली नसली तरी पक्षाकडून राजन साळवी यांना AB फॉर्म देण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. राजापूर मतदारसंघातून राजन साळवी निवडणूक लढणार असल्याची शक्यता आहे.

उमेदवाराचे नाव: राजन साळवी

पक्ष: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

मतदारसंघ: राजापूर लांजा

राजकीय कारकीर्द: २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये आमदार

राजन साळवी २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये असे तीन वेळा आमदार झाले आहेत. राजन साळवी यांनी पहिल्याच वेळी २००५ साली नारायण राणे यांची शिवसेना सोडली आणि काँग्रेस मधे प्रवेश केला. त्यावेळी राजापूर लांजा मतदारसंघ पोटनिवडणूक झाली. त्यावेळी पोटनिवडणुकीसाठी काँगेसचे उमेदवार गणपत कदम आणि शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत झाली होती. त्यावेळेस राजन साळवी पराभूत झाले होते. यानंतर २००९ मधील विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचे उमेदवार गणपत कदम आणि शिवसेनेचे राजन साळवी अशी लढत झाली.

चुरशीच्या लढतीमध्ये शिवसेनेचा भगवा राजन साळवी यांनी फडकवला होता आणि २००९ साली पहिल्यांदा राजन साळवी हे आमदार बनले. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षीय उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले होते. त्यावेळी राजन साळवी ७६२३३ मतांनी विजयी झाले होते. नंतर २०१९ साली काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात चुरशीची लढत झाली आणि त्यावेळी राजन साळवी यांना ६५४३३ तसेच अविनाश लाड यांना ५३३६४ मते पडली.

२०१९ निवडणुकीत काँग्रेसचे अविनाश लाड यांचा निवडणुकीत अकरा हजार कमी मतांनी निसटता पराभव झाला होता. यानंतर शिवसेनेत दोन भाग झाल्यानंतर राजन साळवी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटासोबत राहिले.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश