Kishor Jorgewar Enters BJP 
विधानसभा निवडणूक 2024

Kishor Jorgewar: अखेर किशोर जोरगेवार यांचा भाजपात प्रवेश

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश घेतला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

Published by : Team Lokshahi

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश घेतला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यामुळे आता जोरगेवार यांना चंद्रपुरातून भाजपची उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जात आहे.

मागील काही दिवसांपासून जोरगेवार प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होते. शरद पवार यांच्या भेटीला ते गेले होते. पण तिथे त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी भाजपची वाट धरली. यात भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी त्यांना भक्कम पाठबळ दिले. त्यामुळे मुनगंटीवार यांची इच्छा नसतानाही जोरगेवार यांना पक्षात प्रवेश देण्याचे आदेश पक्षाने दिले आणि त्या आदेशावर मुनगंटीवार यांनी आज अंमल केला. यावेळी हंसराज अहिर हेही काही वेळाने उपस्थित झाले.

आज जोरगेवार यांच्यासह महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर आणि इतर अनेकांनी प्रवेश घेतला. मुनगंटीवार यांनी जोरगेवार यांच्या नावाला मोठा विरोध केला, पण पक्षाच्या निर्णयामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. यामुळे मुनगंटीवार समर्थकांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे. हा असंतोष कसा थोपवून धरला जातो आणि त्यात नेत्यांना यश मिळेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भाजप, शिवसेना, काँग्रेस व अपक्ष असा राजकीय प्रवास असलेले अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष प्रवेश स्पष्टपणे नाकारल्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या व शेवटी आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार भाजपात स्थिरावले. 

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी