विधानसभा निवडणूक 2024

Kalyan Shirkant Shinde: "सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणाऱ्यांना कळणार नाही गरीबी काय असते", श्रीकांत शिंदेंची मविआवर टीका

कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारार्थ रोड शोमध्ये खासदार श्रीकांत शिंदे सहभागी झाले होते, यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारार्थ आयोजित रोड शोमध्ये खासदार श्रीकांत शिंदे सहभागी

विरोधकांवर टीका करत श्रीकांत शिंदे यांची महाविकास आघाडीवर आक्रमक टिप्पणी

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडीवर तीव्र शब्दांत टीका केली.

कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारार्थ रोड शोमध्ये खासदार श्रीकांत शिंदे सहभागी झाले होते, यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणाऱ्यांना कळणार नाही गरीबी काय असते अशी टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

ज्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करत न्यायालयात धाव घेतली, महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर सर्वात आधी लाडकी बहीण योजना बंद करू असे सांगणारे आता निवडून आल्यावर लाडक्या बहिणींना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ असे जाहीर करत असून हा फार मोठा विरोधाभास असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले, काहींनी 1500 रुपयांत कोणाच घर चालतं असा सवाल केला मात्र जे कधी घराबाहेर पडले नाही त्यांना दुसऱ्यांच घर कसं चालतं हे कळणार नाही.

आता पराभव समोर दिसू लागल्याने घाबरून तीन हजार रुपये देण्याचे खोटं आश्वासन देत आहेत, एकीकडे योजनेला विरोध करायचा आणि दुसरीकडे खोटी आश्वासने द्यायची अशा सावत्र भावांपासून सावध राहण्याचे आवाहन श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांना केले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 'माझा बुथ, सर्वात मजबूत' अभियान

नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोजाची गुन्हे शाखेकडून 6 तास चौकशी

आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

रोहिणी खडसेंसह कार्यकर्त्यांचा बोदवड पोलीस ठाण्यात ठिय्या

सिडकोच्या 26 हजारांच्या घरांच्या सोडत प्रक्रियेला 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ