थोडक्यात
मुंबईत 36 पैकी 16 जागा जिंकत भाजपची जोरदार मुसंडी
लोकसभात झालेली पीछेहाट भरून काढली
मविआला आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी आव्हान
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. यामध्ये महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला तर महाविकास आघाडीने 46 जागांवर विजय मिळवला. यामध्ये महायुतीत भाजपला 132 जागा, शिवसेना शिंदे गटाला 57 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 16 जागा, ठाकरे गटाला 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा मिळाल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर मुंबईत 36 पैकी 16 जागा जिंकत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. यातच आता महाविकास आघाडीपुढे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आव्हान उभे केल्याचे पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेली पीछेहाट पाहता मुंबईत 36 पैकी 16 जागा जिंकत ही भाजपची जोरदार मुसंडी आहे.