विधानसभा निवडणूक 2024

महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत महत्त्वाची बैठक; जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. याच पार्श्वभूमीवर काल महायुतीने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमधून सरकारच्या कामाचा रिपोर्टकार्ड सादर करण्यात आला.

याच पार्श्वभूमीवर आज महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार होते मात्र त्यांचा हा दौरा रद्द झाला. आज हरियाणाचे नवे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे देखील दिल्लीत जाणार आहेत. यासोबतच देवेंद्र फडणवीस, अजित पवारही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून यात काय चर्चा होतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : मतमोजणीला सुरुवात; कोण उधळणार विजयाचा गुलाल?

Election Commission | निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर गोंधळ, काँग्रेस आणि ठाकरे गटाचा कॉलमचं नाही

Ajit Pawar | Baramati | बारामतीत अजित पवार आघाडीवर, युगेंद्र पवार पिछाडीवर | Lokshahi News

आतापर्यंतच्या पोस्टल मतमोजणीत 'हे' नेते आघाडीवर

शिवसेना ( एकनाथ शिंदे ) - 38