विधानसभा निवडणूक 2024

हिना गावित यांची राजीनामा दिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या...

नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का

  • अक्कलकुवा मतदारसंघात हिना गावित यांची बंडखोरी

  • हिना गावितांनी पक्षाकडे पाठवला राजीनामा

नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी खासदार हिना गावित यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे आमदार के सी पाडवी यांच्या विरोधात अक्कलकुवा मतदारसंघात हिना गावित अपक्ष म्हणून मैदानात उतरणार आहेत. महायुतीकडून शिवसेना आमदार आमशा पाडवी रिंगणात असून उमेदवारी न मिळाल्याने हिना गावित यांनी बंडखोरी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर हिना गावित यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, आम्ही अक्कलकुवा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माझ्या उमेदवारी मागचं कारण असं की, नंदुरबारची जी जागा आहे की महायुतीत भारतीय जनता पार्टीला सुटली. भारतीय जनता पार्टीची उमेदवारी आदरणीय डॉ. विजयकुमार गावित साहेब यांना देण्यात आलेली आहे. लोकसभा मतदारसंघात मी उमेदवारी 4 महिन्यांपूर्वी करत असताना मी महायुतीची उमेदवार होती आणि माझ्याविरोधात शिवसेनेचं नंदुरबार जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी विरोधात काम केलं. या गोष्टी मी पक्षाच्या वरिष्ठांना लोकसभा निवडणुकीतसुद्धा सांगितल्या. स्वत: शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरी देखील शिवसेनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसचाच प्रचार केला.

आता विधानसभेमध्येसुद्धा त्यांनी तेच सुरु केलेलं आहे. त्यांनी आताही काँग्रेसच्या चिन्हावर शिवसेनेच्या व्यक्तीला उभं करुन संपूर्ण शिवसेना ही काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करते आहे. काँग्रेसचं जे कार्यकर्ते होते तेसुद्धा प्रचारात दिसत नाहीत पण शिवसेनेचं जे पदाधिकारी आणि शिवसेनेचं कार्यकर्ते हेच काँग्रेसचा प्रचार करत आहेत. त्यामुळे मी माझ्या पक्षाचे जे वरिष्ठ आहेत आदरणीय देवेंद्रजी यांनाही सांगितले की, याठिकाणी जर शिवसेना अशाचप्रकारे लोकसभेसारखं विधानसभेतसुद्धा जर काँग्रेसचा प्रचार करत असेल तर मीसुद्धा माझी जी उमेदवारी अक्कलकुवा मतदारसंघात अपक्ष करण्याचे निश्चित केलं आहे ते मी मागे घेणार नाही. माझ्यामुळे आपल्याला कुठलाही त्रास होऊ नये, म्हणून मी राजीनामा पक्षाचा आपल्याला पाठवते आहे. असे हिना गावित म्हणाल्या.

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर

Anushka Sharma Post On Virat Kohli HBD: विराटच्या वाढदिवसानिमित्त अनुष्काची खास पोस्ट

Eknath Shinde | 'लाडक्या बहिणींसाठी जेलमध्ये जायला तयार'; कल्याणमध्ये एकनाथ शिंदेंचं वक्तव्य

Saie Tamhankar: सईच्या 'द इलेव्हेंथ प्लेस' घरात "दिवाळी पहाट" उत्साहात साजरी, पाहा खास फोटो

'माझी लढाई ही दिल्लीच्या तक्ता विरोधात; कारण...' सुप्रिया सुळे