भाजपा महायुतीचे ऐरोली विधानसभेचे उमेदवार गणेश नाईक यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे . मतदान केंद्रात सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी गणेश नाईक यांनी मतदान केलं.
मतदान केल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना गणेश नाईक म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभान निवडणूक 2024 या निवडणुकीकरता सकाळी 7 वाजताच मी मतदान केलं आहे.
लोकशाहीचा उत्सव सगळ्यांनी अतिशय आनंदपूर्वक, गांभीर्याने आपल्या स्वत:च्या आणि राज्याचे, देशाते भवितव्य घडविण्याकरता आपलं कर्तव्य बजावा. महायुतीचा उमेदवार म्हणून यशस्वी होईन हा माझा विश्वास आहे. असे गणेश नाईक म्हणाले.