निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.
20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ऐरोली मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गणेश नाईक म्हणाले की, आजवर 90सालापासून मी निवडून आलो. त्या पद्धतीचीच ही निवडणूक वाटते. याच्यापेक्षा काय फरक नाही. मला कुठल्याच पक्षाचे आव्हान वाटत नाही. महायुतीचे घटक, नेते लोक सगळ्यांना आदेश देतात की त्या ठिकाणी तुम्ही आपला युतीधर्म पाळा. आता काही लोकांना नसेल पटत तर त्यांनी नाही पाळावा. असे गणेश नाईक म्हणाले.