विधानसभा निवडणूक 2024

काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी लांबणीवर?; 'या' दिवशी जाहीर होण्याची शक्यता

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी लांबणीवर पडणार असल्याची चर्चा सुरु असून ही यादी 25 ऑक्टोबरला जाहीर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या काँग्रेसच्या यादीच 50पेक्षा जास्त नावं असल्याची माहिती मिळते आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 63 जागांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यातच महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नसल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांना महत्वाची जबाबदारी दिली आहे.

पुणे एअरपोर्टवरील 11 विमाने उडवून देण्याची धमकी

समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार

समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार; 'या' तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता

निफाड तालुक्यातील भाजपचे यतीन कदम शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना

पिंपरी-चिंचवडच्या भोसरीत पाण्याची टाकी कोसळली; 2 ते 3 कामगारांचा मृत्यू