विधानसभा निवडणूक 2024

मेळघाटातील 6 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

आदिवासींना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • मेळघाटातील 6 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

  • आदिवासींना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार

  • 6 गावातील 1 हजार 300 मतदारांचा मतदानावर बहिष्कार

सूरज दहाट, अमरावती

मेळघाटमधील आदिवासींना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. अमरावतीच्या मेळघाट परिसरातील 6 गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

रंगूबेली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खामदा, किन्हीखेडा, धोकरा, कुंड आणि खोकमार या सहा गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला असून 6 गावातील 1 हजार 300 मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

केवळ घोषणा होतात मात्र सुविधा मिळत नसल्याचा त्यांचा आरोप असून मूलभूत सुविधा, पाणी, रोड, वीज नाही, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर, आरोग्य सेवा मिळत नाही, पिण्याचे पाणी नियमितपणे नसल्याने नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ऐरोलीत गणेश नाईक वि. ठाकरेंच्या शिवसेनेचे मनोहर मढवी

PM Modi Speech | 'Rahul Gandhi यांच्या तोंडातून हिंदूहृदयसम्राट वदवून दाखवा', मोदींचा टोला

NEWS PLANET With Vishal Patil |नारा एक, भूमिका अनेक; 'बटेंगे तो कटेंगे'वरून पंकजा मुंडेंचा घरचा आहेर

Rajesaheb Deshmukh Parli Assembly election 2024 : परळीत हाय व्होल्टेज सामना! राजेसाहेब देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे

Dhananjay Munde Parli Assembly election 2024 : धनंजय मुंडेंसमोर मराठा उमेदवाराचे आव्हान