Shivsena Meeting 
विधानसभा निवडणूक 2024

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शिंदेंच्या उपस्थितीत ताज लॅँण्ड्स एण्डमध्ये बैठक सुरु आहे.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्रात नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. महायुतीला निवडणुकीत घवघवीत यश मिळालं. महायुतीमधील घटक पक्ष असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षासाठी ही निवडणूक म्हणजे अग्निपरिक्षा होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष फुटीनंतर जनतेचा आशीर्वाद मिळतो का याकडे सगळ्याचं लक्ष वेधलं होतं. निकालानंतर चित्र स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळालं. महायुतीतील घटक पक्षांनी ठिकठिकाणी ढोलताशाच्या गजरात मिरवणुका काढून आनंदोस्तव साजरा केला.

थोडक्यात

  • शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

  • शिंदेंच्या उपस्थितीत ताज लॅण्ड्स एण्डमध्ये बैठक

  • आमदार प्रताप सरनाईक अनुमोदकपदी

विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये शिवसेना आमदार आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मंत्री उदय सामंत यांनी हा प्रस्ताव मांडला आणि या प्रस्तावावर शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांनी सहमती दर्शवली. आमदार प्रताप सरनाईक अनुमोदकपदी निवड करण्यात आली. शिंदेंच्या उपस्थितीत ताज लॅँण्ड्स एण्डमध्ये बैठक सुरु आहे. बैठकीत नवनिर्वाचित आमदारांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सन्मानही करण्यात आला.

महायुतीने तब्बल २३० जागा जिंकल्या. तर महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर समाधान मानावं लागलं. महायुतीमध्ये भाजपाला १३०, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १५ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १४ जागा जिंकल्या आहेत.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट