थोडक्यात
एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार आज दिल्लीला जाण्याची शक्यता
सत्ता स्थापन आणि मंत्रिमंडळाबाबत आज निर्णय होण्याची शक्यता
मुख्यमंत्री कोण होणार या मुद्यावर चर्चा
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. यामध्ये महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला तर महाविकास आघाडीने 46 जागांवर विजय मिळवला. यामध्ये महायुतीत भाजपला 132 जागा, शिवसेना शिंदे गटाला 57 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 16 जागा, ठाकरे गटाला 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा मिळाल्या आहेत.
आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे ते म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार? यावर आता राजकीय वर्तळात देखील चर्चा सुरु झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सत्ता स्थापन आणि मंत्रिमंडळाबाबत आज निर्णय होण्याची शक्यता असून मुख्यमंत्री कोण होणार या मुद्यावर देखील चर्चा होणार आहे. या सरकारमध्येही एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री राहणार असल्याची माहिती मिळत आहे. आज मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.