धनंजय महाडिकांनी लाडक्या बहिणींना दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. 'आमचे पैसे घेऊन विरोधकांचं कौतुक चालणार नाही'1500 रुपये घेऊन कॉंग्रेसच्या रॅलीमध्ये जाणाऱ्या महिलांचे फोटो काढा आणि त्यांचे फोटो पाठवा मग व्यवस्था करतो असं वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केलं आहे.
धनंजय महाडिक म्हणाले की, लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीमध्ये किंवा सभेमध्ये दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या आणि त्यांचे नाव लिहून घ्या आणि मग आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो. म्हणजे घ्यायचं आमच्या शासनाचं आणि गायचं त्याचं असं नाही चालणार. महाडिक पुढे म्हणाले की, अनेक ताया महाराष्ट्रात आहेत, छाती बडवत आहेत. आम्हाला नकोत पैसे, आम्हाला नकोत आम्हाला सुरक्षा पाहिजे. पैसे नकोत? राजकारण करता पैशांचे? काँग्रेसच्या सभेला महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे, काँग्रेसच्या रॅलीला महिला दिसल्या जाऊन त्यांचे फोटो काढायचे. आम्ही व्यवस्था करतो त्यांची, अशी धमकीच महाडिक यांनी दिली आहे. यानंतर महाडिक म्हणाले की, ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर त्यांना आपण ही योजना पुरवू अस माझ्या बोलण्याचा अर्थ होता
राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणावर निवडणूक विभागाने आक्षेप घेतला आहे. धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या भाषणावर निवडणूक विभागाने आक्षेप घेतला आहे. 2023 चे कलम 179 अन्वेय आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.