महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या प्रचारसभांमुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची पुन्हा एकदा भरपावसात सभा झाली आहे. तर दुसरीकडे शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांची ही सभा भरपावसात होत आहे. त्यामुळे नेमका पाऊस कोणाला फलदायी ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
थोडक्यात
देवेंद्र फडणवीस यांची कराडमध्ये भरपावसात सभा
दुसरीकडे शरद पवार यांचीही भरपावसात सभा
पावसात भिजलो की सीट निवडून येते: फडणवीस
कराड उत्तर मतदार संघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सुरु असताना अचानक पाऊस सुरु झाला. आणि भर पावसातच फडणवीसांची सभा पार पडली. तर दुसरीकडे कोल्हापूरच्या इचलकरंजीत शरद पवारांच्या सभेला 2019 प्रमाणेच यंदाही पावसाने हजेरी लावली. २०१९ मध्ये साताऱ्यात भर पावसात पवारांची एक सभा झाली आणि निवडणुकीच्या मैदानाची गणितंच बदलली. त्यातच आता फडणवीस आणि पवार या दोन्ही मातब्बर नेत्यांच्या सभा पावसात पार पडल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसातील संपूर्ण भाषण पाहा-