देवेंद्र फडणवीस चंद्रपुरात किशोर जोरगेवार यांच्या सभेत प्रचारासाठी उपस्थित असताना भाषणादरम्यान म्हणाले की, मला असा विश्वास आहे की, किशोर जोरगेवार यावेळी मागच्या मतांपेक्षा जास्त मतांनी जिंकून येतील. चंद्रपुरात आता कमळ फुलवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. चंद्रपूर हा माझा जिल्हा आहे, जोरगेवार यांची चंद्रपूरच्या दीक्षाभूमीसाठी शंभर कोटी मंजूर करवून घेतले. नागपूरच्या दीक्षाभूमीला आम्ही दोनशे कोटी दिले. शेतकऱ्यांसाठी देखील सरकारने विविध योजना सुरू केल्या. एक रुपयात पीक विमा, वीज बिल माफ केले. शेतकऱ्यांना 12 वरून 15 हजार देण्याचा निर्णय आता महायुतीच्या सरकारने घेतला आहे.
त्याचसोबत कर्जमाफीचा निर्णय देखील घेतला आहे. अनुसूचित जाती जमातीसाठी विविध योजना आणल्या. याचसोबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देणार'. आमचं सरकार होत त्यावेळी वेगळं ओबीसी मंत्रालय केलं. मोदीजी मला म्हणाले होते मला भारताला विकसित देश करायचं आहे पण त्यासाठी आधी महिलांना सक्षम करणं महत्त्वाचं आहे. महिलांना सक्षम केल्याशिवाय भारत विकसित होऊ शकत नाही असं मोदीजी म्हणाले होते.
लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहिण योजना आणली त्यामुळे विरोधक नुसते ओरडत होते. पण अकरा लाख बहिणी लखपती दीदी झाल्या. अडीच कोटी महिलांच्या खात्यात पैसे टाकले. आता पुढे एक कोटी महिलांना लखपती दीदी करणार. काँग्रेसच्या सावत्र भावांनी कोर्टात जावून योजना बंद करण्याचा प्रयत्न केला. कोर्टाने त्यांची मागणी फेटाळली आणि योजना यशस्वीपणे सुरू आहे. यापुढे महायुतीचे सरकार आले तर, 2100 रुपये लाडक्या बहिणींना देणार पण काँग्रेस आली तर योजना बंद होईल.