विधानसभा निवडणूक 2024

Supriya Sule Solapur Speech : देवाभाऊंनी रोजगार गुजरातला दिल- सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळेंनी महेश कोठे यांच्या सोलापुरच्या सभेला उपस्थिती दाखवली आणि त्यादरम्यान देवाभाऊंच्या गळ्यात भ्रष्टाचाराचं लॉकेट असा त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

Published by : Team Lokshahi

सुप्रिया सुळेंनी महेश कोठे यांच्या सोलापुरच्या सभेला उपस्थिती दाखवली आणि त्यादरम्यान त्यांनी विरोधीपक्षावर चांगलीच टीका केली आहे. देवाभाऊंच्या गळ्यात भ्रष्टाचाराचं लॉकेट असा त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, एका हाताने तुम्हाला 1500 रुपये दिले आणि दुसऱ्या हाताने तुमच्याकडून 2200 रुपये तेलाचे केले की नाही ते मला सांगा. मविआचं सरकार जर आलं तर तुमच्या ज्या मुलभूत गोष्टी आहेत त्यांची किंमत स्थिर ठेवायची जबाबदीरी ही मविआची आहे. माझं हे भाषण रेकॉर्ड करून ठेवा तुम्ही आम्ही आमचं सरकार आल्यावर एक ही मुलाला आणि मुलीला बेरोजगीचा शिकार होऊ देणार नाही त्यांना त्यांच्या हक्कीची नोकरी आम्ही देऊ.

खरी समस्या ही देवाभाऊमुळे निर्माण होत आहे. बंदुक पोलीसांच्या हातात असायला हवी आमचा देवाभाऊ स्वतः सगळ्या बंदुकी घेऊन फिरतो आहे. तुमच्याकडे ज्यावेळेस हे विरोधीपक्षाचे नेतेमंडळी येतील त्यावेळेस त्यांच्याकडून सगळ घ्या दोन्ही हाताने घ्या कारण ते जे काही देणार आहेत ते त्यांच नसणार आहे ते त्यांनी तुमच्या आमच्याकडून घेतलेलंच तुम्हाला परत देणार आहेत. अधिकार तुमचा त्याच्यावर आहे हे 50 खोक्यांच सरकार आहे. दोन हजार कोटी घेऊन आपलं सरकार पाडल. आमचे देवाभाऊ म्हणतात की, सोलापुर रेडिमेंट कपडा शिलाईचे जिल्हा परिषदेचे काम गुजरातला दिल आहे. खर आहे का? आमच्या पोरांच्या ताटातला घास तुम्ही काढून घेऊ नका. जे महाराष्ट्राच आहे ते महाराष्ट्रातच राहूद्या

Anil Deshmukh Car Attack: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम

Latest Marathi News Updates live: अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक...

Narendra Modi Nigeria Award: पंतप्रधान मोदींना नायजेरियाचा दुसरा-सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Gold Rate Decrese | सोन्याच्या दरात मोठी घसरण; सोन्याच्या भावात 15 दिवसात 5500 रुपयांची कमी

Manipur | मणिपूरमध्ये 'एनडीए'त मोठी फूट; 'एनपीपी'चा सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय | Marathi news