विधानसभा निवडणूक 2024

Devendra Fadnavis : उमेदवारी अर्ज भरण्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये उमेदवारी अर्ज भरणार असून सकाळी 9 वाजता संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहे.

याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला असं वाटते की, सहावी निवडणूक आहे. पण जनतेचा आशीर्वाद आणि आईचा आशीर्वाद दोन्ही माझ्या पाठिशी आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणे सहाव्या निवडणुकीतही मागच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये चांगला विजय मिळाला. तसाच चांगला विजय मिळेल. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी