विधानसभा निवडणूक 2024

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी विजयाच्या जल्लोषात पंकजा मुंडेंवर सडकून टीका केली. पक्ष धोरणे बदलण्याचा आरोप.

Published by : shweta walge

थोडक्यात

  1. सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाची धोरणे बदलण्यास आणि भाजपासोबत विश्वासघात करण्याचा आरोप केला.

  2. पंकजा मुंडे यांचे राजकारण केवळ विरोध करण्यापुरते मर्यादित आहे, असे सुरेश धस यांनी सांगितले.

  3. भाजपाच्या विजयाचे श्रेय त्यांनी कार्यकर्त्यांना दिले, त्यांच्या मेहनतीमुळेच विजय शक्य झाला, असे ते म्हणाले.

बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांनी 75 हजारांचे मताधिक्य घेत विजय मिळवला आहे. हा विजय झाल्यानंतर आष्टी मतदार संघात मोठा जल्लोष कार्यकर्त्यांनी केला. यादरम्यान आयोजित विजयी सभेत सुरेश धस यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

पंकजाताई तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. तुम्ही शिरूर येथील सभेत येतात आणि भाजपाचा पंचाखाली टाकता. तुम्हचे पीए फोन करतात आणि अपक्ष उमेदवाराला मतदान करण्याचे सांगतात. असं म्हणत धस यांनी पंकजा मुंडें विरोधात आपला रोष व्यक्त केला आहे. पंकजाताई तुम्ही एक चांगला व्यक्ती गमावला आहे. तुमच्या जवळचे लोक बदला असा सल्ला देखील धस यांनी पंकजा मुंडेंना दिला आहे.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...