विधानसभा निवडणूक 2024

Congress Candidate List 2024 : कॉंग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर; 48 उमेदवारांची घोषणा; पाहा कुणाला कुठून संधी?

कॉंग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

Published by : shweta walge

कॉंग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पक्षाने परंरागत साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून, तर कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात संगमनेर येथून रिंगणात उतरणार आहेत. तर कसबा पेट येथून रविंद्र धंगेकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि शिवसेना (UBT)मध्ये बरीच वाद विवाद सुरु होते. एकीकडे मविआ तुटते की काय अशा चर्चाणा देखील उधाण आलं होतं. त्यातच आज आज काँग्रेसने अखेर पहिली यादी जाहीर करून या सगळ्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेने काल (23 ऑक्टोबर) पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसनेही आपली पहिली यादी जाहीर केली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतील घटकपक्ष राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) यांच्याशी जागा वाटपासंबंधी अनेक वाद विवाद, बैठका पार पडल्यानंतर त्यानंतर आज महाराष्ट्र काँग्रेसने गुरुवारी ४८ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली.

काँग्रेसची ४८ जणांची यादी- मतदारसंघ आणि उमेदवार

अक्कलकुआ - के.सी पाडवी
शाहादा - राजेंद्रकुमार गावीत
नंदुरबार - किरण तडवी
नवापूर - श्रीकृष्णकुमार नाईक
साकरी - प्रवीण चौरे
धुळे ग्रामीण - कुणाल पाटील
रावेर - धनंजय चौधरी
मलकापूर - राजेश एकाडे
चिखली - राहुल बोंद्रे
रिसोड - अमित झनक
धामणगाव रेल्वे - वीरेंद्र जगताप
अमरावती - सुनील देशमुख
तिवसा - यशोमती ठाकूर
अचलपूर - अनिरुद्ध देशमुख
देवळी - रणजीत कांबळे
नागपूर दक्षिण पश्चिम - प्रफुल्ल गुडधे
नागपूर मध्य - बंटी शेळके
नागपूर पश्चिम - विकास ठाकरे
नागपूर उत्तर - नितीन राऊत
साकोली - नाना पटोले
गोंदिया - गोपाळदास अग्रवाल
राजूरा - सुभाष धोटे
ब्रह्मपुरी - विजय वडेट्टीवार
चिमूर - सतीश वारजूकर
हदगाव- माधवराव पवार पाटील
भोकर- तिरुपती कदम कोंडेकर
नायगाव- मीनल पाटील खतगावकर
पाथरी- सुरेश वडपूरकर
फुलंब्री- विलास औताडे
मीरा भाईंदर- मुझफ्फर हुसेन
मालाड पश्चिम- अस्लम शेख
चांदिवली- आरीफ नसीम खान
धारावी- ज्योती गायकवाड
मुंबादेवी- अमीन पटेल
पुरंदर- संजय जगताप
भोर- संग्राम थोपटे
कसबा पेठ- रविंद्र धंगेकर
संगमनेर- बाळासाहेब थोरात
शिर्डी- प्रभावती घोगरे
लातूर ग्रामीण- धीरज देशमुख
लातूर शहर- अमित देशमुख
अक्कलकोट- सिद्धराम म्हेत्रे
कराड दक्षिण- पृथ्वीराज चव्हाण
कोल्हापूर दक्षिण- ऋतुराज पाटील
करवीर- राहुल पाटील
हातकणंगले- राजू आवळे
पळूस कडेगाव- विश्वजीत कदम
जत- विक्रमसिंह सावंत

Cyclone Dana : ओडिशामध्ये दाना वादळांचं भयानक संकट; ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट

देवेंद्र फडणवीस नितीन गडकरींच्या भेटीला, 10 जागांच्या तिढ्याबाबत चर्चा?

Ravindra Dhangekar on Congress Candidate List | रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर, धंगेकर म्हणाले...

Congress Candidate List 2024: काँग्रेसची पहिली यादी जाहीर

Delhi Mahayuti Meeting | दिल्लीतील चर्चा पूर्ण, उद्या मुंबईत अंतिम चर्चेची शक्यता | Marathi News