मोठी बातमी समोर आली आहे. अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील खल्लार गावात माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या राड्यादरम्यान र नवनीत राणा यांच्या अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्या थोडक्यात बचावल्या. या सगळ्या घटनेनंतर नवनीत राणा यांनी खल्लार पोलीस स्टेशनमध्ये केली तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारसभेदरम्यान ही घटना घडली.