विधानसभा निवडणूक 2024

५० हून अधिक मतदारसंघांत नामसाधर्म्य असलेले उमेदवार: मतविभाजनाची भीती

राज्यात ५० हून अधिक मतदारसंघांत नामसाधर्म्य असलेले उमेदवार उभे राहिल्यामुळे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना मतविभाजनाची भीती आहे. रायगडमध्ये १९९० पासून सुरू झालेला हा ट्रेंड आता राज्यभर पसरला आहे.

Published by : shweta walge

थोडक्यात

  1. राज्यातील ५० हून अधिक मतदारसंघांत नामसाधर्म्य असलेले उमेदवार उभे राहिले आहेत, ज्यांची नावे प्रमुख उमेदवारांसोबत मिळतीजुळती आहेत.

  2. प्रमुख पक्षाच्या उमेदवारांना नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांच्या उपस्थितीमुळे मतविभाजनाची भीती आहे.

  3. रायगडमध्ये १९९० पासून नामसाधर्म्य असलेले उमेदवार अपक्ष म्हणून उभे राहू लागले, आणि आता हा ट्रेंड राज्यातील इतर मतदारसंघांमध्येही पसरला आहे.

राज्यात ५० हून अधिक मतदारसंघांत नामसाधर्म्य असलेले उमेदवार उभे राहिले आहेत, आणि त्यांच्या नावे प्रमुख उमेदवारांसोबत मिळतीजुळती आहेत, जसे जयंत पाटील, मंदा म्हात्रे, नवाब मलिक इत्यादी. यामुळे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना मतविभाजनाची भीती सतावत आहे.

रायगडमधील मतदारसंघांत १९९० पासून नामसाधर्म्य असलेले उमेदवार अपक्ष म्हणून उभे करण्यात आले होते, आणि आता हा ट्रेंड राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये पसरला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही २८८ पैकी ५० हून अधिक मतदारसंघांत नामसाधर्म्य असलेले उमेदवार निवडणूक लढवत आहेत, ज्यामुळे मुख्य पक्षांच्या उमेदवारांना सध्या मोठ्या प्रमाणावर चिंतेत टाकले आहे.

मुंबईतील चांदिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे दिलीप लांडे हे निवडणूक लढवत आहेत. येथे दिलीप लांडे नावाचे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

● मानखुर्द- शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवाब मलिक हे अधिकृत उमेदवार असून येथेही नवाब मलिक नावाचे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

● वांद्रे पूर्वमध्ये अजित पवार गटाचे झिशान सिद्दिकी या अधिकृत उमेदवाराच्या नावाशी साम्य असलेले झिशान सिद्दिकी अपक्ष निवडणूक लढवत आहेत.

● नवी मुंबईत बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप नाईक यांच्यात मुख्य लढत आहे. येथेही मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक या दोघांचेही नामसाधर्म्य असलेले उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

● अंबरनाथमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या राजेश वानखेडे यांच्या नावाशी साम्य असलेले राजेश वानखेडे अपक्ष उभे आहेत, अलिबागमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या महेंद्र दळवी यांच्याच नावाचे तीन अपक्ष उमेदवार उभे आहेत.

● कर्जतमध्ये शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आणि उरणमध्ये ठाकरे गटाच्या मनोहर भोईर यांच्या नावाचे तर रत्नागिरीतील दापोली मतदारसंघात शिंदे गटाच्या योगेश रामदास कदम या नावाशी तंतोतंत साम्य सांगणारा उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. याव्यतिरिक्त योगेश कदम नावाचा आणखी एक उमेदवारही आहे.

● ठाकरे गटाच्या संजय वसंत कदम यांच्या नावाशी साम्य असलेले दोन उमेदवार अपक्ष म्हणून उभे आहेत. चिपळूणमध्ये अजित पवार गटाचे शेखर निकम आणि शरद पवार गटाचे प्रशांत यादव यांच्या नावाशी साम्य असलेले उमेदवार आहेत.

NEWS PLANET With Vishal Patil |नारा एक, भूमिका अनेक; 'बटेंगे तो कटेंगे'वरून पंकजा मुंडेंचा घरचा आहेर

Rajesaheb Deshmukh Parli Assembly election 2024 : परळीत हाय व्होल्टेज सामना! राजेसाहेब देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे

Dhananjay Munde Parli Assembly election 2024 : धनंजय मुंडेंसमोर मराठा उमेदवाराचे आव्हान

PM Modi Sabha LIVE: पंतप्रधान मोदी यांच्या सभेला अजित पवारांची पाठ

Latest Marathi News Updates live: राहुल गांधी यांनी अचानक नांदेडच्या बसस्थानकात दिली भेट,नागरिकांशी साधला संवाद