उमेदवार प्रोफाईल

Vaibhav Naik Kudal Malvan Constituency : वैभव नाईक हॅट्रिक करणार?

काँग्रेसमधून वैभव नाईक यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.

Published by : Siddhi Naringrekar

उमेदवाराचे नाव - वैभव विजय नाईक

मतदारसंघ - कुडाळ- मालवण

पक्षाचं नाव - ठाकरे शिवसेना

समोर कोणाचं आव्हान - निलेश राणे

काँग्रेसमधून वैभव नाईक यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. कणकवली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी पहिल्यांदा निवड झाली. त्यानंतर नारायण राणे 2005मध्ये काँग्रेसमध्ये गेल्यानंतर लगेचच त्यांनी काँग्रेससोडून शिवसेनेत प्रवेश केला. 2009 मध्ये नारायण राणे विरुद्ध वैभव नाईक अशी लढत झाली. त्यात वैभव नाईक यांचा २५ हजार पेक्षा जास्त मतांनी नारायण राणे यांनी पराभव केला.

2014च्या निवडणुकीत नारायण राणे विरुद्ध वैभव नाईक अशी लढत झाली आणि कुडाळ-मालवण मतदारसंघातून नारायण राणेंचा 10 हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव करत महाराष्ट्रात जायंट किलर म्हणून ख्याती मिळवली. 2019 मध्ये नारायण राणे यांचे कट्टर समर्थक असलेले रणजीत देसाई यांचा तब्बल 15 हजार मतांनी पराभव करत दुसऱ्यांदा कुडाळ-मालवण मतदारसंघातून विधानसभेत गेले.

Aditya Thackeray Dhruv Rathee: आदित्य ठाकरेंनी युट्युबर ध्रुव राठीचं आव्हान स्वीकारलं; नेमकं प्रकरण काय ?

Ajit Pawar Interview | कटेंगे तो बटेंगे ते महाराष्ट्राची महानिवडणूक, अजित पवारांची रोखठोक मुलाखत

दिल्ली-एनसीआरची हवा 'विषारी'

BJP Batenge To Katenge: 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा, वाढला राजकीय पारा

भरपावसात फडणवीसांची सभा, पावसात भिजलो की सीट निवडून येते: फडणवीस