उमेदवाराचं नाव - शिवसेना उद्धव ठाकरे) राजू शिंदे
मतदारसंघ - औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ
पक्षाचं नाव - शिवसेना एकनाथ शिंदे
समोर कोणाचं आव्हान - (शिवसेना एकनाथ शिंदे) संजय शिरसाट
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात यंदा प्रथमच दोन शिवसेनेत अटीतटीचा सामना होत आहे.
राजू शिंदे यांची जमेची बाजू
- एमआयएमने उमेदवार न दिल्याने मुस्लीम समाजाची मते मिळण्याची अपेक्षा.
- मागील निवडणुकीत पराभवामुळे यावेळी तयारीनिशी निवडणूक रिंगणात.
- शिंदे हे मूळचे भाजपचे असल्याने या पक्षाचा त्यांना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा.
- जरांगे फॅक्टरवर मदार.
आ. शिरसाट यांची उणे बाजू
-पंधरा वर्षांपासून आमदार, मात्र केवळ दोन वर्षातच विकासकामे.
-मतदारसंघात कमी आणि मुंबईतच अधिक काळ राहात असल्याचा विराेधकांचा आरोप.
-मातोश्रीची साथ सोडल्याने शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांत नाराजी.
-पंधरा वर्षानंतरही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात अपयश.
-गुंठेवारीमध्ये बसलेल्या लघु उद्योजकांच्या समस्या न सोडविल्याने नाराजी.
सन २००९ पासून औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे नेतृत्व संजय शिरसाट करीत आहेत. नगरसेवक, सभागृह नेता असा राजकीय प्रवास करीत शिरसाट २००९ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. पश्चिम मतदारसंघातून त्यांनी २००९ ते २०१९पर्यंत विजय मिळवला आहे.