उमेदवाराचे नाव : राजेसाहेब देशमुख
मतदारसंघ : परळी मतदारसंघ
पक्षाचे नाव ; राष्ट्रवादी शरद पवार
समोर कोणाचं आव्हान ; ( राष्ट्रवादी अजित पवार ) धनंजय मुंडे
परळी विधानसभा निवडणुकीत यंदा ११ उमेदवार रिंगणात असले तरी, महायुतीतील अजित पवारगटाचे धनंजय मुंडे, तर महाविकास आघाडीचे शरदपवार गटाचे राजेसाहेबदेशमुख यांच्यात दुरंगी लढत आहे.
राजसाहेब देशमुख हे सध्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. मात्र त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. राजेसाहेब देशमुख हे यापूर्वी बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती होते. काँग्रेसच्या रजनी पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून राजेसाहेब देशमुख यांची ओळख आहे.
शरद पवार यांनी या मतदारसंघामध्ये राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली. मागील दीड वर्षांपासून मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना राजेसाहेब देशमुख हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी जवळीक साधून होते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या माध्यमातूनही ते बीडमध्ये गावोगावी गेले आहेत.
मतदारसंघातील आव्हानं-
धनंजय मुंडेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचं संघटन केलं आहे. लोकांना सहज उपलब्ध होणारा नेता, अशी त्यांची प्रतिमा आहे. विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. मात्र, त्यावेळी धनंजय मुंडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते.
उमेदवाराचे प्लस पॉईंट्स;