उमेदवाराचं नाव - निलेश नारायण राणे
पक्षाचं नाव - शिवसेना
मतदारसंघ - कुडाळ मालवण
समोर कोणाचं आव्हान - वैभव नाईक
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निलेश राणे यांनी तब्बल 20 वर्षांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण हाती घेतला. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात यंदा साऱ्यांचं लक्ष लागले आहे. या मतदारसंघात वैभव नाईक आणि निलेश राणे यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.
निलेश राणे 2009 ते 2014 काँग्रेसमध्ये होते. 2014 मध्ये लोकसभेच्या खासदार निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी निलेश राणे यांचा पराभव केला . त्यानंतर पुन्हा 2019मध्ये लोकसभेच्या खासदार निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी निलेश राणे यांचा पराभव केला.
कुडाळ-मालवण मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आमदार वैभव नाईक आणि शिवसेनेकडून निलेश राणे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. 2014 मध्ये वडील नारायण राणे यांचा कुडाळ-मालवण विधानसभेत पराभव झाला होता. यातच आता निलेश राणे निवडणूक लढवत आहेत. यातच आता विद्यमान आमदार वैभव नाईक यांचा ग्रामीण भागातील संपर्क पाहता निलेश राणे यांनी सुद्धा जनसंपर्क वाढविल्याचे पाहायला मिळत आहे.
निलेश राणे हे राजकारणासोबतच समाजकारणही करत असतात. तौकते वादळ, दरवर्षी होणारी अतिवृष्टी यामध्ये होणारे नुकसान यावेळी अनेक कुटुंबांना मदत केलेली आहे. आरोग्याच्या दृष्टीने अनेक जणांना आर्थिक मदत करून दिलेली पाहायला मिळाली.