उमेदवाराची माहिती - उत्तर महाराष्ट्र
उमेदवाराचं नाव- हिरामण भिकाजी खोसकर
पक्षाचं नाव- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट
मतदारसंघ- इगतपुरी-त्रंबकेश्वर
समोर कोणाचं आव्हान-निर्मला रमेश गावित काँग्रेस पक्षाच्या माजी आमदार (दोन वेळेस )आणि मनपा नगरसेवक दहा वर्ष सध्या निर्मला गावीत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत
उमेदवाराची कितवी लढत- 4 लढत तर 2019 मधील आकडेवारी शिवसेनेचे उमेदवार ubt निर्मला गावित यांचा पराभव करत एकतीस हजार पाचशेमतांनी हिरामण खोसकर विजयी झाले होते.
मतदारसंघातील आव्हानं-सर्वाधिक संपादित झालेल्या जमिनी यामुळे प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्याच आव्हान आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये मुकणे धरण प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या
वैतारणा धरण प्रकल्पग्रस्तांच्या अतिरिक्त जमिनी पुन्हा शेतकऱ्यांना मिळवून देणे
त्र्यंबक तालुक्यातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचा साधन तयार करून देणे यामुळे तेथील शेतकऱ्यांचा स्थलांतरण थांबेल साठवण तलाव आणि बंधारे यांची निर्मिती
उमेदवाराचे प्लस पॉईंट्स - इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अति ग्रामीण भागात रस्त्यांची निर्मिती
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवीधरण मंजुरी कामी महत्त्वाचा सहभाग
इगतपुरी त्रंबकेश्वर मतदार संघात आरोग्य दूत म्हणून ओळख
आरोग्य व्यस्थेवरती विशेष काम
अधिवेशनामध्ये सर्वाधिक प्रश्न विचारण्याचा विक्रम
विरोधी बाकावर बसल्यानंतर देखील सर्वाधिक विकासनिधी नाशिक जिल्ह्यामध्ये आणणारे आमदार