उमेदवार प्रोफाईल

Deepak Kesarkar Sawantwadi Assembly Constituency : दीपक केसरकर चौथ्यांदा गड राखणार?

दिपक केसरकर चौथ्यांदा २०२४ ची विधानसभा निवडणूक लढवित आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

उमेदवाराचे नाव - दीपक वसंत केसरकर

मतदारसंघ - सावंतवाडी

पक्ष- शिवसेना

समोर कुणाचं आव्हान - राजन तेली

दिपक केसरकर चौथ्यांदा २०२४ ची विधानसभा निवडणूक लढवित आहेत. 2001 मध्ये थेट जनतेतून राष्ट्रवादीच्या तिकीटावर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. पहिल्यांदा काँग्रेसमध्ये होते. 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर राष्ट्रवादीत आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. 2009 मध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे शिवराम दळवींचा पराभव करून राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2012 मध्ये नारायण राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना डीपीडीसीच्या बैठकीत दीपक केसरकर आणि नारायण राणे यांचे बिनसले. यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करत निलेश राणे यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादीतून बाहेर पडले.

निलेश राणेंच्या खासदारकीच्या पराभवानंतर 2014च्या विधानसभा निवडणुकीआधी दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या तिकिटावर दुसऱ्यांदा विधानसभेवर 2014मध्ये निवडून गेले. यानंतर ग्रामविकास आणि अर्थराज्यमंत्री पद मिळाले. पालकमंत्री पद उद्धव ठाकरे यांनी दिपक केसरकर यांना दिलं. याच कालावधीत गृहराज्यमंत्री पदी बढती करण्यात आली.

2019मध्ये पुन्हा तिसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले. परंतु, उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्रिपद दिले नाही. यानंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदे सरकार बसल्यानंतर महत्त्वाची प्रवक्ते पदाची जबाबदारी शिवसेनेची त्यांनी सांभाळली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना शालेय शिक्षणमंत्री हे कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद दिले.

दिपक केसरकर यांचे प्लस पॉईंट्स पाहिले तर सावंतवाडीत असलेल्या मोती तलावाचं सुशोभीकरण त्यांनी केलं आहे. अनेक पर्यटक हा मोती तलाव बघण्यासाठी येत असतात. यासोबतच केसरकर यांच्या प्रयत्नातून वेंगुर्ले येथे पाणबुडी प्रकल्प येणार असून सावंतवाडी आणि दोडामार्ग येथे क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. तसेच वेंगुर्लातील झुलता पूल. जो पर्यटकांना आकर्षिक करत आहे. अनेक पर्यटक याला भेट देण्यासाठी येत असतात. दिपक केसरकर यांनी सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी या झुलत्या पुलासाठी निधी मंजूर केला.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : सुरवातीच्या कलांनुसार महायुतीची मुसंडी

Wayanad Election Result 2024 : वायनाडमध्ये प्रियांका गांधी आघाडीवर; भाजपाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर

Marathwada Region Election Result 2024 : मराठवाड्यात जरांगे फॅक्टर कमी पडले का?

Kolhapur District Assembly Constituency : पहिल्या कलामध्ये जिल्ह्यात महायुतीची आघाडी!

Election Commission | निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर गोंधळ, काँग्रेस आणि ठाकरे गटाचा कॉलमचं नाही