उमेदवाराचे नाव : डॉ. अर्चना पाटील
मतदारसंघ : लातूर शहर
पक्षाचे नाव - भाजप
समोर कोणाचं आव्हान - (काँग्रेस) अमित देशमुख \ (वंचित बहुजन आघाडी) विनोद खटके
उमेदवाराचे प्लस पॉईंट्स;
भाजपने डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी दिली आहे. माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य असलेल्या चाकूरकर यांना स्थानिक मतदारांमधील असंतोष आणि लिंगायत मतांचा लाभ मिळेल, असा अंदाज आहे. प्रचारादरम्यान त्यांनी देशमुखांविरुद्ध विकासाचे मुद्दे उपस्थित करत मतदारसंघात अधिक हजेरी राहून काम करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीपुर्वीच अर्चना पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता त्यांना लातूर शहर मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली आहे.
डॉ. अर्चना पाटील सुशिक्षित असून आपल्या रूग्णालयाच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क मोठा राहिलाय. २०१९ सालापासून त्या निवडणुकीची तयारी करताहेत. परंतु कौटुंबिक कारणांनी त्यांनी तेव्हा निवडणूक लढवली नव्हती. आता त्यांना भाजपकडून विधानसभेची संधी मिळालीय.
मतदारसंघातील आव्हानं-
लातूर हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी पाचवेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केले, तर त्यांच्या निधनानंतर अमित देशमुख यांनी याच वारशाला पुढे नेले.
गेल्या पंधरा वर्षांपासून अमित देशमुख या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामध्ये त्यांनी विविध विकास कामे हाती घेऊन मतदारांची मने जिंकली आहेत.