विधानसभा निवडणूक 2024

भाजपाने कोणत्या 13 महिलांना दिली उमेदवारी?

विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीमध्ये भाजपने 13 महिलांना उमेदवारी दिली आहे.

Published by : Team Lokshahi

विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीमध्ये भाजपने 13 महिलांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांनाही भाजपाने उमेदवारी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये 13 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामधून प्रतिभा पाचपुते, पुण्यातील पर्वती मतदारसंघामधून माधुरी मिसाळ, जिंतूर मतदारसंघामधून मेघना बोर्डीकर, भोकर मतदारसंघामधून श्रीजया अशोक चव्हाण, फुलंब्रीमधून अनुराधाताई अतुल चव्हाण, गोरेगावमधून विद्या ठाकूर, बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे, चिखलीमधून श्वेता महाले, दहिसरमधून मनीषा चौधरी, केजमधून नमिता मुंदडा, शेवगावमधून मोनिका राजळे, नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, कल्याण पूर्व मतदारसंघातून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष अनेकांचा पत्ता कट करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, भाजपाने आज 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी