महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मंगळवारी शेवटची तारिख होती. महायुती आणि मविआने निवडणुकीसाठी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. आता प्रत्येक पक्ष निवडणुकांच्या प्रचाराला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.
माहीम विधानसभेत भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा
फडणवीसांकडून अमित ठाकरेंना पाठिंबा जाहीर
फडणवीसांच्या वक्तव्यानं सदा सरवणकरांची अडचण
शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकरांचं निवडून येणं कठीण होणार?
सीएम शिंदेंचीही पाठिंबा देण्याची इच्छा असल्याचा दावा
उद्धव ठाकरेंकडे मतं जाऊ नये म्हणून त्यांनी उमेदवार दिला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
माहिम मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मनसे नेते अमित ठाकरे, शिवसेना नेते सदा सरवणकर तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाच्या लढतीकडे वेधलं आहे.
माहिम विधानसभा मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणूक लढत आहेत. तर दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर या मतदारसंघातून 2009 सालापासून आमदार आहेत. अशातच आता अमित ठाकरे यांना भाजपने पाठिंबा द्यायचे ठरवले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अमित ठाकरेंना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची अडचण झाली आहे.
माहीम विधानसभेत भाजपने मनसे नेते अमित ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकरांचं निवडून येणं कठीण होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनाही अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याची इच्छा असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची मतं जाऊ नये म्हणून त्यांनी उमेदवार दिला असल्याचे मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. महायुतीला विधानसभा निवडणुकीत त्याची परतफेड करायची आहे. त्यासाठी शिवसेना नेते सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरु आहेत. पण ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.