निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.
20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मराठवाड्यात भाजपला विजयी करण्यासाठी 3 राज्यातील भाजप पदाधिकारी मराठवाड्यात दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.
केरळ, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशातील भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी मराठवाड्याच्या विजयासाठी मैदानात उरल्याचे पाहायला मिळत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि पक्षाच्या संघटन मंत्र्यांचा देखील यात समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
छत्तीसगड येथून 26 पदाधिकारी मराठवाड्यात दाखल झाले असून मराठवाड्यातील विजयासाठी भाजपने कंबर कसल्याचे पाहायला मिळत असून त्यामुळे आता याचा मराठवाड्यात भाजपला फायदा होणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.