bjp manifesto published 
विधानसभा निवडणूक 2024

BJP Manifesto: भाजपचा संकल्पनामा प्रकाशित, जाहीरनाम्यात काय?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित करण्यात येत आहे.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्व पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. मतदानाच्या दिवसाचे काऊंटडाऊन सुरु झालं आहे. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह हे महाराष्ट्रात प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पत्रकार परिषद घेत जाहीरनामा प्रकाशित करण्यात येत आहे. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार तसेच भाजपचे इतर दिग्गज नेते उपस्थित आहेत.

भाजपच्या नेतृत्वाखाली राज्याची वेगाने वाढ होत आहे. दरडोई उत्पन्न वाढत आहे. महाविकास आघाडीच्या काळात दरडोई उत्पन्न 6 हजार रुपयांनी कमी झाले होते. पायाभूत सुविधांमध्ये डबल इंजिन सरकारमुळे झपाट्याने वाढ झाली. 10 वर्षांत 13 हजार 60 किलोमीटरहून अधिक वाढ झाली आहे. 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे भाजपचे संकल्प पत्र महत्त्वाचे आहे. हे संकल्पपत्र म्हणजे अलमारीत बंद करण्याचे डॉक्युमेंट नाही. तर अंमलबजावणी करण्याचे डॉक्युमेंट आहे. त्यासाठी एक अंमलबजावणी समिती नेमली असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक स्तराचा विचार करण्यात आला आहे. वयोमानानुसार योजना केल्या आहेत. महाराष्ट्रात 120 वर्षे पूर्ण केलेले 8 लोक आहेत. 0 ते 120 वयोगटातील लोकांचा विचार या संकल्पपत्रात करण्यात आला असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे.

भाजपच्या संकल्पपत्रात लाडकी बहिणी योजनेबद्दल एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी विविध आश्वासने देण्यात आली आहेत. या संकल्पपत्रात महिला, विद्यार्थी, वृद्ध यांच्यावर भर देण्यात आला आहे. त्यासोबतच यात रोजगार, व्यवसाय यांसह विविध मुद्द्यांवरही पुढील 5 वर्षात भर देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

भाजपच्या संकल्पपत्रातील महत्त्वाच्या घोषणा

  • लाडकी बहीण योजनेतील महिलांना 1500 रुपयांवरुन 2100 रुपये दिले जाणार

  • महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण

  • महिलांच्या सुरक्षेसाठी 25000 महिलांचा पोलीस दलात समावेश केला जाणार

  • शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार

  • शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 12 हजार वरुन 15 हजार

  • प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवारा देण्यात येणार

  • वृद्ध पेन्शन धारकांना 1500 वरुन 2100 रुपये दिले जाणार

  • जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार

  • 25 लाख रोजगार निर्मिती

  • महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन

  • ग्रामीण भागात ४५ हजार गावात पांधण रस्ते बांधणार

  • अंगणवाडी आणि आशा सेविकांचे मानधन वाढ करुन त्यांना दर महिना १५ हजार वेतन आणि विमा संरक्षण देणार

  • वीज बिलात ३० टक्के कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार

  • सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या आत व्हिजन महाराष्ट्र @२०२९ सादर केले जाणार

  • २०२८ पर्यंत महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य

  • मेक इन महाराष्ट्र धोरण राबवणार

  • महाराष्ट्राला जागतिक फिनटेक आणि कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) राजधानी बनवणार

  • पहिल्या विशेष AI विद्यापीठाची स्थापना करणार

  • नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि नाशिकला आधुनिक एरोनॉटिकल आणि स्पेस उत्पादन केंद्र बनवणार

  • शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांवरील जीएसटी अनुदानाच्या रुपात परत देणार

  • शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ६००० भाव मिळावा म्हणून सोयाबीन उत्पादन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धनासाठी समर्पित संपूर्ण शृंखलेची स्थापन

  • २०२७ पर्यंत महाराष्ट्रात ५० लक्ष लखपती दीदी तयार करणार प्रत्येकी ५०० स्वयंसहायता गटाचे एक औद्योगिक क्लस्टर तयार करण्यात येईल आणि १००० कोटींचा प्रारंभिक फिरता निधी उपलब्ध करण्यात येणार

  • अक्षय अन्न योजनेतंर्गत कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना दरमहा मोफत शिधा देण्यात येणार, यात तांदूळ, ज्वारी, शेंगदाण्याचे तेल, मीठ, साखर, हळद, मोहरी, जिरे आणि लाल मिरची पावडर यांचा समावेश असणार

  • महारथी अटल टिंकरिंग लॅब्स योजना सुरु करणार

  • महाराष्ट्रात कौशल्य जनगणना करण्यात येणार

  • छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करण्यात येणार. यात को वर्किंग स्पेस, इनक्युबेशन सुविधा असतील. यातून १० लाख नवीन उद्योजक तयार केले जाणार

  • अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय उद्योजकांना व्यवसाय वृद्धीसाठी १५ लाखांपर्यंत व्याजरहित कर्ज देण्यात येणार ओबीसी, एसईबीसी, ईडबल्यूएस, एनटी, व्हीजेएनटीमधील पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येणार

  • १८ ते ३५ वयोगटातील आरोग्य तपासणीसाठी स्वामी विवेकानंद आरोग्य कार्ड सुरु करण्यात येणार

  • नशामुक्त-व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी कायमस्वरुपी योजना लागू करण्यात येणार

  • गड-किल्ले विकास प्राधिकरण स्थापन करणार

  • ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य धोरण स्विकारणार – आधार सक्षम सेवा वितरण लागू करणे, आरोग्य नोंदी, ओळखपत्रे आणि पेन्शन संबंधित कागदपत्रे थेट घरी पोहोचवण्याची व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ओपडी

  • बळजबरी आणि फसवून केलेल्या धर्मांतराविरुद्ध कठोर कायदा करणार

  • मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी AI तंत्रज्ञान, ड्रोन आणि रेडिओ कॉलर तंत्रज्ञानाचा वापर

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : राज ठाकरेंना धक्का; माहिम मतदारसंघातून अमित ठाकरेंचा पराभव, महेश सावंत यांचा विजय

जालन्यात शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर विजयी

Sanjay Upadhyay Wins: बोरिवलीमधून संजय उपाध्याय विजयी

Bachhu Kadu: अचलपूरमधून बच्चू कडू यांचा पराभव

शरद पवार गटाला अजित पवारांचा दे धक्का; सचिन पाटील विजयी